सावदा येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील सावदा येथील पत्रकार फरीद शेख यांच्यावर झालेल्या हिंसक हल्ल्याचा तापी सातपुडा पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रावेर-यावल तालुक्यातील पत्रकारांनी आज सकाळी शासकीय विश्रामगृहावर जोरदार निदर्शने केली.

तरी यापुढे सदर प्रकारे पत्रकारांवर हल्ले झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचा लढा देण्यात येईल असे देखील सर्वानुमते ठरवण्यात आले. या निषेध बैठक प्रसंगी लेवा जगतचे संपादक श्याम पाटील, संघटनेचे कार्याध्यक्ष पंकज पाटील, फारुक शेख, युसूफ शाह, दिलीप चांदेकर, जितेंद्र कुलकर्णी,कमलाकर पाटील, दिलीप भारंबे, लक्ष्मण ठाकूर, रवींद्र हिवरकर, विनोद कोळी, प्रमोद कोंडे, प्रा.उमाकांत पाटील, सुमित पाटील, प्रकाश पाटील, भीमराव कोचुरे, विजय अवसरमल, संतोष नवले, योगेश सैतवाल, वि.के.अवसरमल, प्रदीप महाराज, विनायक जहुरे, भूषण सोनवणे, पुरुषोत्तम संगपाळ, आशिष चौधरी, महेंद्र पाटील, भारत हिवरे, राजू दिपके सह रावेर यावल तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.

 

Protected Content