रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अपमानजनक विधानाच्या निषेधार्थ व परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी दिवंगत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी धनंजयभाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत रावेर तहसीलदार मा.संजय कापसे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/advt-1.jpg)
यावेळी सर्वांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि संविधानसह ‘जय भीम’चा नारा देत बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अनुद्गार काढून इतिहास बदलण्याचा भाजपचा प्रयत्न चालू आहे.मात्र बाबासाहेबांना वगळून इतिहास बदलता येणार नाही.अशा प्रकारचा कुटिल डाव देशातील जनतेला कधीच मान्य होणार नाही. सोबत धुमाभाऊ तायडे, सावनभाऊ मेढे, रामभाऊ वाघोदे,श्री.दिलीप कांबळे, ऍड.योगेशदादा गजरे, बाळू शिरतुरे, प्रदीप सपकाळे,विनोद मोरे, संघरत्न दामोदरे, विजय अवसरमल, प्रशांत गाढे, साहेबराव वानखेडे, जगदीश घेटे,धनराज घेटे, प्रकाश महाले व शेकडो भीमसैनिक उपस्थित होते.