जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेमध्ये नगर रचनाकार दिगेश तायडे हे मागासवर्गीय अधिकारी असून ते आपले काम कर्तव्यनिष्ठ करत आहे, परंतु काही तथाकथित लोकप्रतिनिधी हे त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांच्यावर कट कारस्थान रचून खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा व्यक्तींची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन सोमवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जळगाव जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जळगाव शहरातील महानगरपालिका मधील नगर रचनाकार दिगेश दामोदर तायडे हे मागासवर्गीय कर्तबगार आणि सक्षम अधिकारी म्हणून हे काम करत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांच्यावर काही तथाकथित लोकप्रतिनिधी हे खोटेनाटे आरोप करून त्यांचा कोणत्याच प्रकरणाचा संबंध नसताना त्यांची नाहक बदनामी करत आहे. त्यांच्यावर कट कारस्थान रचून जाणून-बजून त्यांना कोणत्या ना कोणत्या आरोपाखाली गोवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे या संदर्भात चौकशी करून संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी आणि कर्तबगार विकास करणाऱ्या इनामदार मागासवर्गीय अधिकाऱ्याला न्याय मिळवून द्यावा, असे मागणीचे निवेदन सोमवारी २३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. याप्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ता सतीश गायकवाड, महानगराध्यक्ष मनोज अडकमोल, महानगर उपाध्यक्ष दिगंबर सोनवणे, हेमंत सोनवणे, राहुल शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.