जळगाव । पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी शहर युवक आघाडीने पालकमंत्र्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
खाजगी कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात येऊन काही तासांमध्ये शासकीय बैठकांचे सोपस्कार उरकणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अलीकडे जिल्ह्यात फिरकायला देखील तयार नाही. यातच पालकमंत्र्याचा सोमवारचा दौरा देखील रद्द झाल्याने पालकमंत्र्यांना आपण पाहीलयं का, असे पोस्टर घेऊन युवक पदाधिकार्यांनी पालकमंत्र्यांचा निषेध केला. या वेळी युवकचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, मजहर पठाण, तुषार इंगळे, सुशील इंगळे, रिजवान खाटीक,अॅड.सचिन पाटील, नईम खाटीक, इरफान सय्यद, दस्तगीर शहा, अक्षय मोरे, सुशील वानखेडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.