एरंडोल येथील पोलिसांची पदोन्नती

एरंडोल प्रतिनिधी । येथील पोलिस ठाण्याचे कर्मचारी संदीप सातपुते, अमित तडवी, नयना वडनेरे, संदीप पाटील व मिलिंद कुमावत या पोलिस शिपायांना सेवाज्येष्ठतेनुसार पोलीस नाईक पदावर बढती मिळाली आहे. 

त्यांना मिळालेल्या बढतीबद्दल पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे, पोलिस नाईक अनिल पाटील व सुनिल लोहार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पोलिस नाईक ते पोलिस हवालदार व पोलिस शिपाई ते पोलिस नाईक या पदी जिल्ह्यातील एकूण १२० जणांची बढती झाल्याचे आदेश १९जुलै२०२१ रोजी जळगाव पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी काढले होते.

 

Protected Content