एरंडोल येथे भगवान जिव्हेश्वर व बालाजी महाराजांच्या मूर्तींची पालखी मिरवणूक

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे साळी समाजातर्फे सालाबादाप्रमाणे श्रावण वद्य द्वादशीला भगवान श्री जिव्हेश्वर व बालाजी महाराजांच्या मूर्तींची वाजत गाजत शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीची सुरुवात साळी विठ्ठल मंदिर गांधीपुरा भागातून पाताळनगरी मार्गे सेंटर बँक भोई गल्ली, पांडवाला, मारवाडी गल्ली, मेन रोड, मरी माता मंदिर, कॉलेज, गांधीपुरा, मेन रोडमार्गे जाऊन भगवान जिव्हेश्वर मंदिर येथे पालखी मिरवणुकीची सांगता झाली

या मिरवणुकीत साळी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, पंडित साळी प्रकाश मडके, वासुदेव काळे, गोविंदा घोगरे, अरुण साळी, अशोक साळी, विजय दिवटे, क्षमा साळी, शोभा साळी, इंद्रा साळी, राजेंद्र साळी, ललिता साळी, जनाबाई साळी, शुभम साळी, संजय साळी, शिवाजी साळी आदी साळी समाजबांधव भगिनी व बालगोपाल मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Protected Content