वितरण कंपनीच्या तारांना स्पर्श झाल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील भवानी नगरात मीरा रामदास भोई (वय 70 वर्ष) ही वृद्ध महिला घराच्या गच्चीवर कपडे टाकण्यासाठी गेली असता घरावर असलेल्या महावितरण कंपनीच्या तारांना स्पर्श झाल्याने त्यांचा विजेच्या शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

भवानी नगरापासून थोड्या अंतरावर एरंडोल येथील 33 वीज उपकेंद्र असून तेथून भवानी नगराच्या वरून चार विद्युत वाहिनी बाहेरगावी जोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका विद्युत वाहिनीच्या तारेचा शॉक लागून आज गुरुवार, दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास हि घटना घडली

त्याबाबत अरुण सुकदेव भोई यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हेड कॉन्स्टेबल संतोष चौधरी, छाया खैरे, राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहे. दरम्यान मृत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

Protected Content