दीड लाखाचा अवैध सागवान घरात दडवून ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

सावदा ता. रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन घरबांधणी व फर्निचर करण्यासाठी १ लाख ५६ हजार रुपये किंमतीची अवैध साग लाकडे वाहतुक करुन घरामध्ये दडवून ठेवल्या प्रकरणी रावेर वनपाल यांनी भारतीय वन अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे.

आज गुरुवार, दि. २५ ऑगस्ट रोजी यावल उपवनसंरक्षक पद्मनाभ एच.एस. तसेच यावल सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाने वनपरिक्षेत्राधिकारी यावल वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांनी संयुक्तरीत्या मौजे सावदा नगरपालिका हद्दीतील सुगंगा  नगरमधील गणेश कोळी यांच्या बांधकाम चालू असलेल्या घराची झडती घेतली असता अवैधरित्या साग कटसाइज नग – ११८, घ.मी – १.७४१ १ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा माल आढळून आला.

चौकशी दरम्यान नंदुकिशोर अरुण चोपडे रा.निबोरा स्टेशन, रावेर यांनी नवीन घरबांधणी व फर्निचर करण्यासाठी अवैध साग लाकडे वाहतुक करुन घरामध्ये दडवून ठेवली होती. सदर कार्यवाहीत वनपाल रावेर यांनी भारतीय वन अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा सागवान माल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

वनक्षेत्रपाल विक्रम पद्मोर, वनक्षेत्रपाल अजय बावणे, वनपाल रवींद्र सोनवणे, वनरक्षक गोवर्धन डोंगरे, कृष्णा शेळके, भैय्यासाहेब गायकवाड, संभाजी सूर्यवंशी, राजू बोंडल, युवराज मराठे, आयशा पिंजारी, कल्पना पाटील, सविता वाघ, अरुणा ढेपले, वाहन चालक सचिन पाटील, विनोद पाटील, अधिसंख्य वनमजूर यांनी संयुक्तरित्या ही कार्यवाही केली.

Protected Content