श्री कालिंका माता मंदिर जीर्णोध्दार सोहळ्यानिमित्त शोभायात्रा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कासार सेवा संघाच्या वतीने श्री कालिंका माता मंदिर जीर्णोध्दार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात आज जळगाव शहरातील कासार समाजाच्या वतीने अयोध्या नगरातील कालिंका मातेच्या मुर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

जळगाव शहरातील श्री कालिंका माता मंदिर जीर्णोध्दार सोहळ्याचे आयोजन २७ जून ते १ जुलै च्या दरम्यान करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कासार समाजाच्या वतीने करण्यात आला. शुक्रवारी २८ जून रोजी अयोध्या नगरातून मातेच्या मुर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. यात मिरवणूकीची सुरूवात सकाळी १० वाजता करण्यात आली. मिरवणूकीमध्ये विविध चित्ररथ, महिला लेझिम पथक, ढोल पथकासह लहान बालिकांनी देवीच्या सजिव देखाव्याचे आयोजन केले होते. कालिंका माता की जयच्या जयघोषत मिरवणूक काढण्यात आली. पाच दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाला समाज बांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या सोहळ्यात पहिल्या दिवशी मांडणी व मिरवणूक, २८ जुन रोजी प्राणप्रतिष्ठा, २९ जून रोजी मंदीर वास्तू पूजन, ३० जून रोजी प्राणप्रतिष्ठा हवन आणि १ जुलै रोजी सत्यनारायण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

Protected Content