जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात 32 रिक्त महसुल मंडळात / शहरात आधार संच वाटप करण्याबाबत 24 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच आधार संच वाटपाची प्रक्रिया 09 एप्रिल 2025 रोजी करण्यात येणार होती मात्र आता ही निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यांत येत आहे.
या 32 रिक्त मंडळात आधार संच मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झालेले आहेत. तरी, आधार संच वाटपाची प्रक्रिया सुरळीत व्हावी व उत्कृष्ट सेवा देणा-या आपले सरकार सेवा केंद्र धारकांनाच आधार संच मिळावे, त्यासाठी प्राप्त अर्जाची छाननी करणे, स्थानिक चौकशी करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी जळगाव, यांचे आदेशानुसार प्राप्त अर्जाची स्थानिक चौकशी करण्यासाठी संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्ष्यतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समिती मार्फत चौकशी पूर्ण झाल्यावर आधार संच वाटपाची प्रक्रिया केली जाईल.
तरी, अगोदरच्या जाहिरातीमध्ये नमुद केल्यानुसार दि.09 एप्रिल 2025 रोजी होणारी निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यांत येत आहे. प्राप्त अर्जाची समिती मार्फत चौकशी पूर्ण झाल्यानंतर, आधार संच वाटपाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.