पाचोरा प्रतिनिधी । काँग्रेस सदस्या प्रियांका गांधी यांना अटक केल्याप्रकरणी पाचोरा येथे महाविकास आघाडीतर्फे घटनेचा निदर्शने करुन कडकडीत बंद पाळण्यात आला.
उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिस मिश्रा यांने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना कारने चिरडल्याले होते. त्या घटनेत मृत पावलेल्या परिजनांना सांत्वनपर भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधी अटक करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ आज दि. ११ रोजी पाचोरा येथे महाआडीतर्फे घटनेचा निषेध करुन कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली, कडकडीत बंद पाळण्यासाठी माजी आमदार दिलीप वाघ, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, माजी सभापती शेख इस्माईल शेख फकिरा, शिवसेनेचे शहरप्रमुख किशोर बारावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहर खान, शिवसेनेचे प्रविण ब्राम्हणे, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, हारुण देशमुख, बसीर बागवान, कॉग्रसचे माजी तालुकाध्यक्ष प्रा शिवाजी पाटील, पप्पू राजपूत, अॅड. अविनाश सुतार, बाजार समितीचे संचालक रणजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अरुण पाटील, माजी शहराध्यक्ष सतिष चौधरी, सत्तार पिंजारी सह मोठ्या संख्येने महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाआघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद आंदोलन सकाळी ९ वाजता सुरू केले. पाचोरा शहरातील शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, रेल्वे स्टेशन रोड, सराफ बाजार, जारगांव चौफुली, भडगाव रोड परिसरात पदाधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना बंदचे आवाहन केले, शहरात दवाखाने, मेडिकल, दुध डेअरी, पेट्रोल पंप वगळता किराणा दुकान, कटलरी दुकाने, हॉटेल, कापड दूकान, स्टेशनरी दुकाने, पानटपरी,चहा व नास्त्याची दुकाने, सराफी दुकाने मॉल, हार्डवेअर दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.