पंतप्रधानाचा ऑस्ट्रीया दौरा; इंदिरा गांधीनंतर ऑस्ट्रीयाला जाणारे पहिले पंतप्रधान

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | व्हिएन्नात बुधवारी मोदी ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले, दोन्ही देश जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहेत. ही युद्धाची वेळ नाही. परस्पर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्याची आहे, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेन आणि पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान केला.

पंतप्रधान मोदींनी चान्सलर नेहमर यांच्याशी पायाभूत सुविधांचा विकास, अक्षय ऊर्जा व आर्टिफिशियल इंजेलिजन्सच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा केली. मोदींनी रशिया दौऱ्यातही राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या समक्ष युक्रेन युद्धासंदर्भात सांगितले होते की, युद्धाच्या मैदानातून शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. मोदी ४१ वर्षांनंतर ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर येणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. १९८३ मध्ये इंदिरा गांधी ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आल्या होत्या.

चान्सलर कार्ल नेहमर म्हणाले, सर्वात मोठा लोकशाही देश भारताची जगभरात ख्याती आहे. ग्लोबल साउथचा सर्वात प्रभावी देश भारत शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. युक्रेन युद्ध संपवण्यासाठी स्विस शांतता परिषदेतही भारत सक्रिय आहे.

Protected Content