पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ विधानाची सोशल मिडीयात खिल्ली

Narendra Modi in tension

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सोशल मिडीयात चांगलेच ट्रोल होत आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकच्या दिवशी असणाऱ्या हवामानावर भाष्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ विधानावरून सोशल मिडीयात जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

 

एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलाखतीत म्हणाले होते की, ‘बालाकोट एअरस्ट्राईकच्या वेळी अचानक हवामान खराब झाले. त्यामुळे अशा स्थितीत भारतीय वैमानिक पाकिस्तान सीमेत दाखल होतील का? यावरून चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यामुळे वैज्ञानिकांनी सर्जिकल स्ट्राईकची तारिख बदलण्यास सांगितले. मात्र, गुप्ततेच्या दृष्टीने ढगाळ वातावरणाचा आपल्याला लाभही होऊ शकतो. आपण विमान पाकिस्तानच्या रडारमध्ये दिसणार नाही. या वातावरणाचा उलट आपल्यालाच लाभ होईल, असे आपण सांगितले. परंतु सगळेच द्विधा मनस्थितीत होते. अखेरीस मीच म्हणालो, आभाळ आलेले आहे, चला पुढे जाऊ या…’, असे मोदींनी मुलाखतीत सांगितले. मात्र पंतप्रधान मोदींनी केलेल्या या विधानामुळे सोशल मिडीयात जोरदार खिल्ली उडवली जात आहे.

Add Comment

Protected Content