मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण जळगाव परिमंडळ कार्यालयांतर्गत तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना कार्यक्षेत्रात कर्तव्यदक्ष राहून केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.

यात मुक्ताईनगर ग्रामीण कक्षाचे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन विज कर्मचारी संघटनेचे सर्कल अध्यक्ष व तंत्रज्ञ संदीप माळी यांनी केलेल्या केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांची गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.