जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनाच्या नॅक पिअर टीमसमोर विद्यापीठाच्या प्रशासन, वित्त व लेखा विभाग आणि परीक्षा विभागाच्या कामकाजाचे सादरीकरण आज बुधवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी करण्यात आले.
विद्यापीठात नॅक पिअर टीमसमोर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा. किेशोर पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी अनुक्रमे वित्त, प्रशासन आणि परीक्षा विभागाचे सादरीकरण केले. त्यानंतर माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या बैठका घेवून संवाद साधला. त्यानंतर या समितीने आरोग्य केंद्र, केंद्रीय विद्यालय, मुलींचे वसतिगृह, शॉपींग कॉम्पलेक्स आदी ठिकाणी भेटी दिल्या.
शिक्षक भवन येथे माजी कुलसचिव व माजी परीक्षा नियंत्रक, माजी बीसीयुडी संचालक, माजी वित्त व लेखाधिकारी, प्रशाळा संचालक, अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्र व गांधी तत्त्वज्ञान केंद्राचे संचालक यांच्याशी चर्चा केली. दुपारच्या सत्रात विद्यार्थी कल्याण, राष्ट्रीय सेवा योजना, ज्ञानस्त्रोत केंद्र आदी ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर सर्व प्रशाळांना या समितीने भेटी देवून प्रत्यक्ष पाहणी केली.