जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एकलव्य प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक निलेश पाटील यांचे चिरंजीव प्रथमेश पाटील याने बारावी विज्ञान शाखेत प्रथम येऊन स्वतः डॉक्टरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द व मेहनत करून कोणताही क्लास न लावता नीट परीक्षेत (NEET) एकूण ६७५ गुण मिळवत जामनेर तालुक्याचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उंचावले आहे.
त्याच्या यशाबद्दल मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. या अनुषंगाने संस्थेच्या सचिव तथा मा.नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते प्रथमेशचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पेढे देऊन स्वागत केले. याप्रसंगी स्वीय सहाय्यक दिपक तायडे, जिल्हा सरचिटणीसआतिष झाल्टे, भाजपा शहराध्यक्ष रविंद्र झाल्टे, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे, उपशिक्षक निलेश पाटील , उपशिक्षक विलास पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रथमेशला मिळलेल्या यशामुळे जामनेर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.