सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात दिनांक २३, २४, २५ असा तीन दिवस “धनोत्सव” कार्यक्रम संपन्न झाला. आज शेवटच्या दिवशी स्नेहसंमेलनाचे पारितोषीक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विनोद पाटील बोलत होते, विद्यार्थ्यानी आपल्या कला गुणांना मंचावर प्रदर्शित केले पाहिजे व संस्कृतीचे जतन केले पाहिजे, जर स्वप्न सत्यात उतरवायची असतील तर आवश्यक ते नियोजन आणि कठोर मेहनत केलीच पाहिजे असे सांगीतले. या कार्यक्रमत संस्थेचे अध्यक्ष शिरीष मधुकर चौधरी हे उपस्थित होते.
या तीन दिवसांमध्ये महाविद्यालयात वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आला. अविष्कार २०२४-२५ चे विजेते, तसेच महाविद्यालयाला चार विविध विषयात सुवर्णपदक, विद्यापीठातील द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले तसेच कैलासवासी दामोदर नाना चौधरी क्षमता प्रबोधिनीच्या माध्यमातून 22 विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या शुभहस्ते सर्व गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच टीवायबीए ची विद्यार्थिनी रोहिणी माळी यांना महाविद्यालयाचा सर्वोच्च समजला जाणारा आदर्श माता पिता सन्मान देवून तिचे सुनील माळी व आई माळी यांना आदर्श माता-पिता पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
खीलचंद धांडे, छाया सिरसाडे यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला व नयना पाटील, सुजाता इंगळे, पौर्णिमा कोळी यांना गरीब हुशार व होतकरू विद्यार्थी पुरस्कार देवून गौरविण्यात आले, तसेच विद्यापीठात व महाविद्यालयीन स्तरावर सर्वात जास्त गुण मिळविनारे विद्यार्थी, एनएसएस व एनसीसी, महाविद्यालयात ” धणोत्सव” निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा जसे रांगोळी, सोलो डान्स, समूह नृत्य, केस रचना, मेहंदी, काव्यवाचन, वाद विवाद, वक्तृत्व यां विविध स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा ही गौरव करण्यात आला.
याप्रसंगी मंचावर आजच्या कार्यक्रमांचे अध्यक्ष आमदार शिरीष मधुकरराव चौधरी (अध्यक्ष तापी परिसर विद्यामंडळ, फैजपूर) प्रमुख पाहुणे डॉ. विनोद पाटील (कुलसचिव,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव), संस्थेचे पदाधिकारी डॉ.सुधाकर काशिनाथ चौधरी, मिलिंद वघुळदे, लीलाधर चौधरी, प्रा.मुरलीधर फिरके,हरीश जगवाणी, डॉ.एस.एस. पाटील. डॉ.नितीन महाजन, सर्व उपप्राचार्य डॉ.एस. व्हीजाधव, डॉ.हरीश नेमाडे, डॉ. कल्पना पाटील, स्नेह संमेलन समिती प्रमुख डॉ. आय. पी. ठाकूर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे आदि मान्यवर उपस्थित होते. सुत्रसांचालन प्रा.कॅप्टन राजेंद्र राजपूत, प्रा. नाहीदा कुरेशी यांनी केले व आभार डॉ.आय.पी.ठाकूर यांनी मानले.