Home Cities जळगाव भाजपच्या ‘रेल प्रकोष्ठ’ जिल्हाध्यक्षपदी प्रतीक शेठ यांची नियुक्ती

भाजपच्या ‘रेल प्रकोष्ठ’ जिल्हाध्यक्षपदी प्रतीक शेठ यांची नियुक्ती


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भर पडली असून, जळगाव महानगर भाजपच्या ‘रेल प्रकोष्ठ’ जिल्हाध्यक्षपदी प्रतीक शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक प्रभाकर सुर्यवंशी यांनी अधिकृत नियुक्ती पत्र देऊन ही जबाबदारी सोपवली आहे.

प्रतीक शेठ यांची ही नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे यांच्यासह खासदार स्मिता वाघ, आ. राजुमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण आणि आ. अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून प्रतीक शेठ यांनी यापूर्वीही अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या या संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना ही नवीन जबाबदारी दिली आहे. या नियुक्तीनंतर बोलताना पक्षाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे की, प्रतीक शेठ भविष्यात पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून, राष्ट्र प्रथम, एकात्म मानववाद व अंत्योदय या तत्त्वांचा प्रसार करतील. तसेच, सरकार आणि जनता यांच्यातील दुवा बनून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला अधिक बळकट करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील.

प्रतीक शेठ यांच्या या नियुक्तीमुळे जळगाव भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, पक्षाच्या विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound