जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | प्रताप नगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरूपौर्णिमानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प.पू.गुरूमाऊली आण्णासाहेबत मोरे यांच्या आज्ञेनुसार श्री स्वामी महाराजांची अभिषेक करण्यात आला. तर भूपाळी आरतीनंतर गुरू पुजनास सुरूवात करण्यात आली.
शहरातील प्रताप नगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरूपौर्णिमानिमित्त स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. स्वामी समर्थ सेवा केंद्रात सकाळी ८ वाजता अभिषेकेला सुरूवात करण्यात आली. केंद्राच्या आवारात महिला व पुरूष सेवेकरी यांच्यासाठी स्वतंत्र गुरूपूजन बैठकीची व्यवस्था असल्याने प्रत्येक भाविकाला गुरूपुजन करण्यात आले. सकाळी १० वाजता महानैवद्य आणि आरती राजेंद्र कासार आणि माधुरी कासार यांच्याहस्ते करण्यात आली. याप्रसंगी सेवेकरील दिपक मुळे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग याबाबत मार्गदर्शन केले.
जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या वतीने केंद्राच्या आवारात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५० हून अधिक सेवेकरींनी रक्तदान केले. अशी माहिती केंद्राचे जिल्हा प्रतिनिधी विजय निकम, केंद्र प्रतिनिधी भरतसिंग पाटील यांनी दिली.