भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्षपदी प्रमोद नेमाडे

भुसावळ प्रतिनिधी | येथील नगरपालिकेच्या प्रभारी अध्यक्षपदी विद्यमान उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज पदभार सांभाळला.

भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे हे सुटीवर गेले असल्याने त्यांच्या जागी आज विद्यमान उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला आहे. आज नगरपालिकेत त्यांनी प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. नगरपालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि कर्मचारी वृंदांनी त्यांचे स्वागत केले.

दरम्यान, प्रभारी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतांना प्रमोद नेमाडे म्हणाले की, आगामी काळात शहरातील विकासकामांना गती देण्यात येणार आहे. यात सर्व प्रभागांमध्ये विकासाची कामे करण्यात येणार आहेत. लोकनेते एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे आणि नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यामुळे आपल्याला नगराध्यक्षपदाची संधी मिळाली असून या माध्यमातून आपण शहरवासियांची सेवा करणार असल्याचे प्रतिपादन प्रमोद नेमाडे यांनी याप्रसंगी केले.

Protected Content