बिअरची बेकायदेशीर वाहतुक करणारा अटकेत

beer seized

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील गांधी चौकात बियरची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍याला अटक करण्यात आली आहे.

पंकज राजेंद्र साळी (वय ३२, रा.म्युनिसीपल पार्क भुसावळ) हा अँक्टीव्हा मोटारसायकल .क्र एम.एच १९ बीयु ३२०४ या दुचाकीने देशी विदेशी दारु व बिअरची बेकायदेशीर वाहतुक करीत असल्याची गुप्त माहीती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधिक्षक लोहीत मतानी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अंबादास पाथरवट, पोना.सुनिल थोरात,दिपक जाधव,निलेश बाविस्कर पोकाँ कृष्णा देशमुख,उमाकांत पाटील,राहुल चौधरी,सचिन पोळ यांच्या पथकाने त्याला अटक केली.

पंकज साळी याच्या ताब्यातून ३ हजार ९६० रू.किमतीच्या किंग फिशर स्ट्राँग या ब्रँडच्या २४ बाटल्या व
२० हजार रु. किमतीची अ‍ॅक्टीवा मोटार सायकल असा एकुण २३ हजार ९६० रु.किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरन ३२६/१९ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पो. ना. दिपक जाधव करीत आहेत.

Protected Content