मुख्य अभियंता राठोड यांचा सत्कार

rathod satkar

भुसावळ प्रतिनिधी । दीपनगर येथील सुपरक्रिटीकल ६६० मेगावॅट प्रकल्पात नव्यानेच रूजू झालेले मुख्यअभियंता राठोड यांचा सत्कार वंचित बहूजन कंत्राटदार संघटनेतर्फ करण्यात आला.

दीपनगर येथील विस्तारीत ६६० मेगावॅटच्या सुपरक्रिटीकल प्रकल्पात मुंबई येथून आलेले मुख्यअभियंता राठोड यांनी नुकताच आपला पदभार स्विकारला. त्यांनी प्रकल्पाचे काम वेळेच्या आधी व्हावे अशा सुचना अधिकारी तसेच भेल कंपनीच्या अधिकार्‍यांना दिल्या. या प्रकल्पामुळे जिल्हाच्या विकासात अजून भर पडणार असून परीसरातील बेरोजगारींचा प्रश्‍नही सुटणार आहे. या अनुषंगाने वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मुबारक पठाण, प्रदेश सचिव प्रकाश सरदार, उपाध्यक्ष मन्साराम कोळी, संघटक प्रकाश तायडे, सह सचिव उस्मान पठाण, शाखा अध्यक्ष नारायण झटके, सुरेश टाक, संजय अडकमोल, दिनकर सूर्यवंशी, सुरेंदरसींग ठाकुर, संजय रावलकर, निखिल नरवाडे आदी पदाधिकारी उपस्थीत होते. उपमुख्यअभियंता मोहन आव्हाड यांनी पदाधिकार्‍यांचा परीचय करून दिला.

Protected Content