Home Cities अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडीच्या अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडीच्या अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन यांची नियुक्ती

0
9

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील प्रसिद्ध व्यापारी तथा सामाजिक कार्यात सक्रिय असलेले प्रकाश राजमल जैन यांची राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडीच्या अमळनेर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या व्यापारी आघाडीला नवसंजीवनी मिळणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असून, शहरातील व्यापारी वर्गातही समाधानाचे वातावरण आहे.

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अमळनेर शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी ही नियुक्ती जाहीर केली. आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाश जैन यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष चेतन राजपूत, कार्याध्यक्ष गोविंदा बाविस्कर, जितेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस संदीप जैन, निलेश महाजन, युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्रकाश जैन यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रकाश जैन हे अमळनेर शहरातील प्रसिद्ध महावीर आईस्क्रीमचे संचालक असून, गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमधील त्यांच्या सहभागामुळे शहरात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. नियुक्तीनंतर बोलताना प्रकाश जैन यांनी व्यापारी बांधवांच्या समस्या संघटितपणे मांडण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार व्यापारी वर्गापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. व्यापारी आघाडी अधिक सक्षम करून पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या नियुक्तीमुळे अमळनेर शहरातील व्यापारी वर्ग आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संवाद अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांच्या हितासाठी सातत्याने काम करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.


Protected Content

Play sound