अकोला प्रतिनिधी । वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी 31 ऑगस्टला पंढरपूर येथे होणाऱ्या मंदिर प्रवेश आंदोलनाला आपल्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनात स्वत: प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.
वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या 31 ऑगस्टला पंढरपुरला ‘विश्व युवा वारकरी सेने’चं मंदिर प्रवेशासाठी आंदोलन आहे. या आंदोलनात स्वत: प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. या दिवशी एक लाख वारकऱ्यांसोबत पंढरीतील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा आंबेडकरांनी सरकारला दिला आहे.
पंढरपुरातील वारकरी संप्रदायातील संत आणि विविध मठांच्या प्रमुखांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.