प्रकाश आंबेडकर पोलिसांच्या ताब्यात ; बारामतीत दगडफेक

 

PrakashAmbedkarLivemint kk5C 621x414@LiveMint

 

मुंबई (वृत्तसंस्था) वंचित बहुजन आघाडीने आता आरेतील वृक्षतोडी प्रकरणात उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः आरेमध्ये येऊन याला विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, बारामतीतील गुनवडी चौकात याचा निषेध म्हणून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली.

 

प्रकाश आंबेडकर आज (रविवार) आरेत पोहचले. वंचित बहुजन आघाडीने नेहमीच आरेतील झाडांच्या तोडीला विरोध केला आहे. आम्ही या वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी आणि सरकारला प्रश्न करण्यासाठी येथे आलो आहोत, असे यावेळी आंबेडकरांनी सांगितले. पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटायला लागले आहेत. बारामतीतील गुनवडी चौकात याचा निषेध म्हणून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. बसवर ‘बाळासाहेबांना अटक करणाऱ्या बीजेपी सरकारचा निषेध’ असे फलक लावून दगडफेक झाली. दगडफेक करणारे 4 अज्ञात तरुण फरार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने घाईघाईत रात्रीच्या वेळीच झाडांची कत्तल सुरु केली. त्यामुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला जोरदार विरोध केला आहे.

Protected Content