अमळनेर (प्रतिनिधी) मनुष्य जन्माला आल्यानंतर आयुष्यात कर्तव्य बजावताना कर्माला प्राधान्य दिले पाहिजे. कर्म आणि कर्तव्य यांचे महत्व भागवत गीतेत सांगितले आहे. असे प्रतिपादन एरंडोल येथील सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारी प्रल्हाद महाजन यांचा सेवापूर्ती सोहळ्यात गटविकासअधिकारी सुभाष जाधव यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षथानी गटविकास अधिकारी सुभाष जाधव तर माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता आर.बी. बावीस्कर, शाखा अभियंता एन.जे. पाटील, आर.एस. पारधी, दीपक पाटील, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जेष्ठ पत्रकार बी.एस. चौधरी, जितेंद्र महाजन, के.वाय. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रल्हाद महाजन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात ३४ वर्ष सेवा बजावली. यावेळी शालिग्राम मालकर यांनी सांगितले की, व्यक्ति नोकरी करतांना कोणत्या पदावर आहे हे महत्वाचे नसून तो ज्या पदावर आहे, ते प्रामाणिकपणे करीत निष्ठा ठेवीत सेवा करणे महत्वाचे असते. याप्रसंगी प्रल्हाद महाजन यांचा मान्यवरांचा हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.हिरालाल पाटील तर आभारप्रदर्शन भरत महाजन यांनी केले.