गुड न्यूज : मुंगसे येथील बाधीत महिला कोरानामुक्त !

जळगाव प्रतिनिधी । कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेली अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील कोरोना पॉझिटीव्ह महिलेने या विषाणूवर मात केली असून तिचा ताजा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. यामुळे ही महिला कोरोनामुक्त होणारी जिल्ह्यातील दुसरी रूग्ण ठरली आहे.

अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील ६० वर्षाच्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. अमळनेर तालुक्यातील ही पहिली रूग्ण होती. यानंतर अमळनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, या महिलेवर जळगाव येथील कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. १४ दिवसांचे उपचार केल्यानंतर या महिलेची पुन्हा चाचणी घेण्यात आली असता तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आढळून आला. यामुळे आता ही महिला कोरोनामुक्त झालेली आहे.

दरम्यान, या महिलेचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असला तरी पुन्हा एकदा नमूना घेऊन तपासणी करण्यात येणार आहे. यानंतरच या महिलेच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती कोविड रूग्णालयातून रात्री देण्यात आली.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content