प्रहार जनशक्ती पक्ष दाखल करणार अविश्‍वास प्रस्ताव

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विद्यमान ठाकरे सरकारवर हा गट वा भारतीय जनता पक्ष नव्हे तर बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष अविश्‍वास प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष अशा ५० आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे आता सिध्द झाले आहे. यातच अपात्रतेच्या कारवाईचा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला असून यावर ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. अर्थात, कोर्टाने दिलेल्या निर्देशांमध्ये अविश्‍वास प्रस्तावाबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. यामुळे आता अविश्‍वास प्रस्ताव कशा पध्दतीत दाखल होणार याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

या पार्श्‍वभूमिवर, आता शिंदे यांचा गट वा भारतीय जनता पक्ष नव्हे तर बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष राज्यपालांना पत्र लिहून ठाकरे सरकार यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करणार आहे. त्यांच्या या प्रस्तावाला भाजप, एकनाथ शिंदे यांचा गट आणि अन्य अपक्ष असे मिळून पारीत करून ठाकरे सरकार पाडतील अशी रणनिती आता आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या वा परवा बच्चू कडू हे राज्यपालांना भेटणार असल्याचे समजते.

Protected Content