अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशाभिमान जागविणाऱ्या प्रशासनाचे प्रगती कोचिंग क्लाससेच्या विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे प्रशासनाचे आभार मानले आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. गावकुसापासून तर देश पातळीवर देशाभिमान जागविणाऱ्या, देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन करून आपल्या प्रशासनाने अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला.
त्यासाठी उत्कृष्ट नियोजन करणारे अधिकारी, शासन व प्रशासन यांचे आभार मानने आपले नागरी कर्तव्य समजून आमच्या क्लास च्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी पत्र लेखनाचा एक भाग म्हणून अमळनेर शहरातील सर्व सन्माननीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हस्तलिखित पत्राद्वारे आभार व्यक्त केले.
यात मुख्यत्वे : प्रांताधिकारी अमळनेर प्रांत विभाग, सीमा अहिरे, मुख्यकार्यकारी अधिकारी सोनपा अमळनेर, प्रशांतजी सरोदे, पोलिस निरीक्षक अमळनेर शहर जयपालजी हिरे या सर्व सन्मानीय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञतापूर्वक व्यक्त केलेल्या आभार पत्रांचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यासाठी क्लासचे संचालक संदिप महाजन व अनिल माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.