जामनेर प्रतिनिधी । प्रहार जनशक्ती संघटनेने जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच जिल्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या जामनेर तालुकाध्यक्षपदी प्रदीप गायके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय भोसले, युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते जामनेर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून प्रदीप गायके, जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून मनोजकुमार महाले, युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख जीवन सपकाळ यांची निवड करण्यात आली.
या आढावा बैठकीचे आयोजन तेली समाज मंगल कार्यालय भुसावळ याठिकाणी करण्यात आले होते. आढावा बैठकीत पक्षाचे ध्येय धोरण तसेच पक्षाची पुढील रचना कशी असेल याविषयी चर्चा होऊन आगामी सर्व निवडणुका बळावर लढवण्याची घोषणा करण्यात आली. निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आवाहन आलेल्या सर्वच प्रमुख वक्त्यांनी केले. या कार्यक्रमात जामनेर तालुक्यातील लहासर येथील भाजपातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.