जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा येथील बोहरा सेंट्रल स्कूलमधील हिंदी विभाग-प्रमुख प्रदीपकुमार सुरेश कळसकर यांनी हिंदी क्षेत्रात गेली १६ वर्ष केलेले योगदान, त्यांची सेवा लक्षात घेता दि.२५ मे रोजी हैदराबाद येथे “ग्लोबल इंटरनॅशनल फाऊंडेशन” आणि “राष्ट्रभाषा हिंदी सेवा संघ-हैदराबाद”, ग्लोबल इंटरनॅशनल विद्यापीठ, अमेरिका द्वारा, ग्लोबल इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथे त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देवून गौरविण्यात आले.
यूएसए कुलपती डॉ.सौरभ पांडेय, मिस एशिया युनिव्हर्स पूजा निगम, राष्ट्रभाषा हिंदी सेवा संघ अध्यक्ष डॉ.सुनील दुबे आदी मान्यवरांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देवून गौरविण्यात आले.ते कुसुम व सुरेश बारसु कळसकर (सेवानिवृत्त-माध्यमिक शिक्षक, शिरसोली, जळगाव) यांचे सुपुत्र आहेत.