Home Cities जळगाव भुसावळ येथे लेवा समाज मंडळातर्फे वधू-वर सूची प्रकाशनाचे आयोजन

भुसावळ येथे लेवा समाज मंडळातर्फे वधू-वर सूची प्रकाशनाचे आयोजन

0
104

leva samaj mandal

भुसावळ प्रतिनिधी । येथील श्री सद्गुरु झेंडूजी महाराज बेळीकर लेवा पाटीदार समाज संस्था व श्री महालक्ष्मी ग्रुपतर्फे १५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या बैठकीत उपवर मुला मुलींसाठी वधु वर सूची परिचय पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरविण्यात आले आहे.

परिचय पुस्तकात नावे देण्यासाठी लागणाऱ्या अर्जाचे यावेळेस प्रकाशन तसेच वितरण करण्यात आले. जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, बुलढाणा जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातील समाज बांधवांनी उपवर मुला मुलींचे परीचय पत्रक भरून दिनांक १० जानेवारी २०२० पर्यंत द्यावे असे आवाहन अध्यक्ष दिनेश भंगाळे यांनी केले आहे. वधू-वर परिचय पुस्तिका व स्नेहमिलन सोहळा यासंदर्भात नियोजन करण्यात आले.

प्रसंगी सुधीर पाटील, सुरेश देवकर, सुपडू भंगाळे, झेंडूजी महाराज बेळीकर संस्थेचे अध्यक्ष दिनेश भंगाळे, सचिव अनिकेत पाटील, किशोर पाटील, सुरेश बऱ्हाटे, अरुण धांडे, किशोर पाटील, किरण कोलते, दिपक धांडे, बबलू बऱ्हाटे, प्रशांत देवकर, मोहन पाटील, अरविंद कुरकुरे, प्रा.धिरज पाटील, बाबुराव भंगाळे, कैलास कुरकुरे, शिशिर जावळे, सुनील बऱ्हाटे, चंद्रकांत पाटील, प्रकाश पाटील, धर्मराज देवकर, दीपक झांबरे, नितीन लोखंडे, महेश भारंबे, नितीन इंगळे, अशोक पाचपांडे, प्रदीप भंगाळे, संतोष लोखंडे, अशोक नेहेते, आनंदा पाटील, योगेश झांबरे, समाधान कुरकुरे, किशोर पाटील, दिलीप महाजन, गणेश किनगे व बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound