चोपडा प्रतिनिधी । जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती तथा चोपडा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण आणि अभिवादन करत प्रचार रॅलीला सुरुवात केली.
प्रचार रॅली आझाद चौक, आशा टॉकीज, बडगुजर गल्ली, गोल मंदिर, गुजराथी गल्ली, चिंच चौक, फुले नगर, हुडको कॉलनी, सुंदर गढी, गणेश कॉलनी, फकीर वाडा, अरुण नगर, शिव कॉलनी आदी परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीप्रचंगी चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, भाजपाचे चंद्रशेखर पाटील, भाजपाचे मुलुख मैदान तोफ शांताराम पाटील, शेतकी संघाचे माजी चेअरमन हिम्मतसिंग पाटील, माजी जि.प.सदस्य शांताराम सपकाळे, शिवसेनेच्या नेत्या इंदिरा पाटील, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन प्रल्हाद पाटील, माजी पंचायत सभापती रमेश महाजन, भाजपाचे प्रदीप पाटील, डी.पी.साळूखे, माजी पंचायत समितीचे उपसभापती मुरलीधर बाविस्कर, सीताराम देवराज, सुभाष कोळी, सुनील पाटील, नगरसेवक गंजेंद्र जैस्वाल, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे यांच्या सोबत अनेक दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्ये उपस्थितीत होते.