विधानसभा निवडणूक पुढे ढकला – राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । पूरस्थितीमुळे राज्यातील विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर पुन्हा जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, राज्य सरकारला पूरग्रस्तांच्या वेदनेशी काही एक देणेघेणे नाही. सांगली आणि कोल्हापूरमध्ये एवढी भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना यात्रांची नाटकं कसली सरकारकडून केली जात आहेत? पूरस्थिती निर्माण झाल्या झाल्या तिथे लष्कर का पाठवलं नाही? जे नुकसान झालं आहे ते भरुन यायला, माणसं स्थिर व्हायला वेळ लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणूक येते आहे. ती पुढे ढकलावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच याबाबत आपण यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याची माहितीदेखील राज ठाकरे यांनी दिली.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, फक्त राजकारण करायचं आणि लोकांना वार्‍यावर सोडायचं हे या सरकारचं धोरण आहे. पक्ष आणि मतभेद सगळं बाजूला ठेवून जे पूरग्रस्त आहेत त्यांना मदत केली गेली पाहिजे. नैसर्गिक संकट येतं तेव्हा अशाच धोरणाचा अवलंब करायचा असतो. मात्र या सरकारला निवडणूक आणि सत्ता उपभोगणं याशिवाय काहीही दिसत नाही.

Protected Content