महावितरणमध्ये प्रभारी राज कायम ठेवण्यासाठी मुख्य अभियंत्यांवर राजकीय दबाव

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर महावितरण विभागामध्ये प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांची झालेल्या विनंती बदली झाल्यानंतर कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता नियुक्त करून विवेक स्वामी यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये यासाठी महावितरण विभागातील एक निवेदा प्रक्रियेतील अपात्र व दुसरा बनावट असे दोन भुरट्या ठेकेदारांकडून जळगाव येथील परिमंडळ कार्यालयातील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्यावर बड्या नेत्यांच्या माध्यमातून राजकीय तसेच टेबलाखालून आर्थिक दबाव आणला जात असल्याची चर्चा महावितरण विभागात जोर धरून आहे.

मुक्ताईनगर महावितरण विभागामध्ये एक वर्षांपूर्वी कार्यकारी अभियंता ब्रिजेश गुप्ता यांची अचानक बदली झाल्यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर लगेच लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने त्यांचा प्रभारी कार्यकाळ वाढवण्यात आला व त्याच संधीचं सोने करत महावितरण विभागात काही निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना तसेच बनावट प्रमाणपत्राच्या कागदपत्रांच्या आधारावर ठेकेदार झालेल्या अंगठेबहादूर ठेकेदाराला आर्थिक भागीदार करत त्यांनी स्वतःचे व त्या दोन भुरट्या ठेकेदारांचे भले करत महावितरण प्रशासनाला चुना लावण्याचे काम सुरू केले.

परंतु त्याआधी त्यांनी विनंती बदलीचा अर्ज केला होता दोन महिन्यापूर्वी महावितरण विभागांमध्ये प्रशासकीय बदल्या झालेल्या होत्या त्या अनुषंगाने प्रभारी कार्यकारी अभियंता विवेक स्वामी यांची बदली झालेली होती परंतु त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी रुजू होऊ नये यासाठी अपात्र ठेकेदार व एक बनावट ठेकेदार या दोघांनी जिल्ह्यातील काही मंत्र्यांकडून परिमंडळ कार्यालयातील मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्यावर दूरध्वनी वरून राजकीय व टेबलाखालून आर्थिक दबाव आणून कोणीही अधिकारी मुक्ताईनगर विभागीय कार्यालयात रुजू होऊ दिला नाही. त्यामुळे मुख्य अभियंत्यांच्या या भ्रष्ट,भोंगळ कारभाराबद्दल विभागासह परिसरातील नागरिक शेतकऱ्यांमध्ये महावितरणच्या या अर्थपूर्ण कारभाराबद्दल तीव्र नाराजी व असंतोष आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेमध्ये ज्या ठेकेदारांना बनावट दस्तावेज सादर केल्या प्रकरणी ब्लॅकलिस्ट करणे बंधनकारक होते. अशा ठेकेदारांना महावितरणच्या स्वामींनी प्रसाद रूपात फक्त अपात्र केले व इतर ठेकेदारांच्या नावावर कामे करा मी तुमच्याशिवाय इतर कोणालाही कामे करू देणार नाही जर कोणी कामे करण्याचा प्रयत्न केला.

तर त्याचे बिल मंजूर होऊ देणार नाही असा आशीर्वाद स्वामींनी या दोन भुरट्या ठेकेदारांना दिलेला आहे व त्यामुळे या बनावट अपात्र ठेकेदारांच्या दादागिरी चा महावितरण प्रशासनातील वाढता हस्तक्षेप मुळे हे अपात्र बनावट ठेकेदार विभागीय कार्यालयांमध्ये स्वामींच्या आशीर्वादाने ठाण मांडून बसलेले असल्यामुळे इतर कर्मचारी अधिकाऱ्यांसह ठेकेदार मध्ये व शेतकऱ्यांमध्ये स्वामींच्या या पराक्रमाबद्दल तीव्र नाराजी व संतोष आहे. त्यामुळे हे स्थानिक अपात्र बनावट ठेकेदार हे एनकेन प्रकारे प्रभारी राज कायम राहावा यासाठी कधी सत्ताधाऱ्यांच्या पायावर कधी विरोधकांच्या पायावर लोटांगण घालून मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता यांना आर्थिक तसे राजकीय दबावात घेऊन प्रभारी राज कायम ठेवत असल्याच्या चर्चांना जिल्ह्यातील महावितरण प्रशासनामध्ये उधान आलेले असुन महावितरणच्या स्वामींची ठेकेदाराच्या इशाऱ्यावर वारंवार रद्द होणारी बदली ही प्रक्रिया थांबून मुक्ताईनगर विभागाला कायमस्वरूपी कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंता कधी मिळणार व शेतकऱ्यांसह जनतेला या मर्जीतल्या बनावट,अपात्र ठेकेदारांकडून कधी सुटका मिळणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे

Protected Content