जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या १३७ रिक्त जागांसाठी जळगाव मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये शारीरिक चाचणीसह १०० मीटर, १६०० मीटर धावणे आणि गोळाफेक अशा चाचण्या घेण्यात येत आहे. ही संपूर्ण चाचणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत घेण्यात येत आहे. त्यामुळे यामध्ये कुणालाही गैरप्रकार करता येणार नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी गुरूवारी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली.
जळगाव जिल्ह्यातील १३७ रिक्त पदांसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरती प्रक्रिया १९ जून रोजी पासून राबविण्यात आले आहे. दरम्यान भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ५०० जणांची शारीरिक चाचणी घेण्यात आले तर आज गुरुवारी २० जून रोजी १००० उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे आणि गोळाफेक या प्रमुख चाचणी घेण्यात आल्या. ही संपूर्ण चाचणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत होत. उमेदवाराच्या प्रवेशापासून ते शारिरीक चाचणी पुर्ण होईपर्यंत ही भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेरा कैद होणार आहे. तसेच उमेदवारांना दिलेले मार्क हे त्यांच्यासमोरच दिले जात आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाहीये. या भरती प्रक्रियेत एकूण ६५७ उमेदवारांनी अर्ज केलेला आहे. पाच दिवसपर्यंत ही भरती प्रक्रिया राबवणार असून भरतीच्या शेवटच्या दिवशी महिला उमेदवार असलेल्या १३५० जणांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली.
दरम्यान जिल्ह्यातील व जिल्हा बाहेर असलेल्या बाहेरगावच्या उमेदवारांसाठी पोलीस मुख्यालयातील वेल्फेअर हॉल आणि मंगलम हॉल येथे रात्रीची झोपण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे शिवाय ऐनवेळी आरोग्य ची सेवा देखील उपलब्ध व्हावी यासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करण्यात आलेले आहे अशी माहिती देखील पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे