मतदारांना प्रलोबन देणाऱ्या बी.जे.मार्केट येथील दुकानावर पोलीसांचा छापा; लाखोंची रोड जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी व मतदारांना प्रलोबन देण्यासाठी पैशे देणाऱ्या नवीन बी.जे.मार्केट येथील सायली कॉस्मेटीक ब्यूटी पार्लर दुकानावर पोलीसांनी मंगळवारी दुपारी छापा टाकून सुमारे २ लाख ७५ हजार ५०० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नाकाबंदी करण्यात आलेली असतांना जळगाव शहरातील बी.जे.मार्केट येथील सायली कॉस्मॅटीक ब्यूटी पार्लरवर येथे दोन जणा निवडणूकीत मतदान करण्यासाठी प्रलोबन देण्यासाठी पैशांचे वाटप होत असल्याची गोपनिय माहिती जिल्हापेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार जळगाव जिल्हा पोलीसांनी मंगळवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता छापा टाकला. या कारवाईत २ लाख ७५ हजार ५०० रूपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी संजय भास्कर पाटील वय ५१ आणि अर्चन संजय पाटील वय ३५ दोन्ही रा. कालिंका माता मंदीर परिसर, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख हे करीत आहे.

Protected Content