चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहर पोलीस ठाण्याच्या हद्दतील मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव शहर पोलीसांनी छापा टाकून पाच जणांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य आणि दुचाकी असा एकुण १ लाख ७२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील मॉडर्न डेअरीच्या पाठीमागे जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. दरम्यान, पोलीस पथकाने सोमवारी २२ जानेवारी रोजी रात्री छापा टाकला. या कारवाईत जॉनी ऊर्फ मुन्ना सुंदर काळे वय-38 वर्षे रा. पवारवाडी, चाळीसगाव, मिर्झा ईमरान मोहसीन बेग (वय-44 वर्षे रा. पवारवाडी), अमोल दिलीप जैस्वाल (वय-४५, रा. पवारवाडी), खुशाल अनिल जैस्वाल (वय-39 वर्षे रा. स्टेशन रोड मस्जीद जवळ चाळीसगाव) आणि कीरण सीताराम गवळी वय-32 वर्षे रा. साने गुरूजी नगर हीरापुर रोड चाळीसगाव यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य आणि दुचाकी असा एकुण १ लाख ७२ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. भुषण पाटील हे करीत आहे.