पोलिस ठाण्यात कर्मऱ्‍यांमध्ये होणार कामाचे समान वाटप – डॉ. उगले

SP Conference 1

जळगाव प्रतिनिधी । पोलीस स्टेशनला असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामांचे समान वाटप करण्यासाठी आजपासून नियोजन डायरी ठेवण्यात आली आहे. या डायरीत प्रत्येकाच्या नावापुढे दिलेल्या कामाची सविस्तर माहिती नोंद केली जाणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आज (दि. २६) एका पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस स्टेशनला बीट कर्मचारी, क्राईम रिपोर्टर आणि क्राईम रायटर यांना कामाचा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत व्हावी यासाठी समान कामांची वाटप पध्दत सुरू करण्याच्या सुचना आज जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिल्यात. त्यानुसार प्रत्येक पोलीस स्थानकात आता नियोजन डायरी अर्थात कामांच्या वाटपासंदर्भात नोंदवही ठेवण्यात येणार आहे. त्याच्यामदतीने प्रत्येकाला नेमून दिलेल्या कामांची तुलना करतांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोपे जाईल. कामचुकार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदेशिर कारवाई देखील करण्याचा इशारा यावेळी डॉ. उगले यांनी दिले.

Protected Content