तरूणाचा खून करणाऱ्या संशयितांना पोलीस कोठडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‍शहरातील पिंप्राळा रेल्वेगेटजवळील मालधक्क्यावर २० वर्षीय तरूणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने दोघांना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

अनिकेत गणेश गायकवाड (वय-२०) रा. राजमालती नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. तर सागर रामु सामुद्रे (वय-१९) रा. राजमालती नगर आणि सुमित संजय शेजवळ (वय-१८) रा. पिंप्राळा असे अटकेतील संशयित आरोपींचे नावे आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिकेत गणेश गायकवाड (वय-२०) रा. राजमालती नगर, जळगाव हा तरूण आई सारीका, वडील गणेश रमेश गायकवाड आणि लहान भाऊ विशाल यांच्यासह वास्तव्याला होता. मंगळवारी २४ मे रोजी रात्रीच्या सुमारास अनिकेत हा काहीही न सांगता घरातून बाहेर गेला होता. दरम्यान, शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळील रेल्वेच्या मालधक्का परिसरातच गोडावुन समोर मध्यरात्री उशीरा तिघेजण दारू पिण्यासाठी बसले होते. अनिकेतचे सागर आणि सुमित सोबत बाचाबाची झाल्याने चाकूने वार करून चेहऱ्यावर दगड टाकून खून निर्घृण खून केला धक्कादायक घटना घडली होती. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी सागर रामु सामुद्रे (वय-१९) रा. राजमालती नगर आणि सुमित संजय शेजवळ (वय-१८) रा. पिंप्राळा हुडको दोघांना यांना मेहरूण परिसरातून बुधवार २५ मे रोजी दुपारी अटक केली होती. दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरूवारी २६ मे रोजी दोन्ही संशयित आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Protected Content