पोलीस अधिक्षक कार्यालयात महिला सहाय्यक कक्षाचे उद्घाटन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते महिला सहाय्य कक्षाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, यांच्यासह महिला सहाय्यक कक्षात कार्यरत महिला कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

महिला सहाय्यक कक्षात येणाऱ्या पती पत्नीच्या कोटुंबिक वादाच्या तक्रारींचे प्रमाण वाढले होते. वर्षाला १ हजार ८०० तक्रारी ह्या येतात. त्यामुळे आधीच्या महिला सहाय्य कक्षात तक्रारदारांना बसण्यास मुबलक जागा तसेच सुविधा मिळत नव्हत्या. ही बाब लक्षात घेता नवीन महिला सहाय्यक कक्ष बांधण्याचा निर्णय पोलीस दलातर्फे घेण्यात आला होता विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांच्या हस्ते या जागेचे गेल्या काळात भूमिपूजनही करण्यात आले होते याठिकाणी महिला कक्षाची नूतन वास्तू उभारण्यात आली आहे. या वास्तूचे गुरुवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नवीन महिला सहाय्यक कक्षात आलेल्या तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना बसण्यास जागा आहे तसेच शौचालयास इतर सुविधा व पाणी पिण्याची सुविधा आहे. महिला सहाय्यक कक्षात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराचे समाधान तसेच जास्तीत जास्त तक्रारी या तडजोड करण्याचा प्रयत्न असल्याचे पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी बोलताना सांगितले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/990597564975012

Protected Content