विना परवाना दारु विक्री करणार्‍या हॉटेलवर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून केवळ पार्सल सुविधेला परवागी देण्यात आली आहे. मात्र तरी देखील भुसावळ रोडवरील जस्ट चिल हॉटेलमध्ये जेवणासह त्याठिकाणी विना परवाना दारुची विक्री करणार्‍यांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणाहून ६ हजार ७८० रुपयांची दारु हस्तगत करण्यात आली असून हॉटेलमालकासह मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शहरातील भुसावळ रस्त्यावरील जस्ट चिल हॉटेल येथे विनापास परवाना दारू विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना गुरूवारी रात्री मिळाली होती. त्यानुसार त्यानी तात्काळ पोलीस कर्मचार्‍यांचे पथक तयार केले. या पथकाने रात्री ९ वाजता पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. त्यात या ठिकाणी पथकाला हॉटेलमध्ये विनापरवाना दारू विक्री होत असताना आढळून आले. तसेच नागरिक जेवनासाठी टेबल उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे हॉटेल मालक सचिन पांडूरंग मराठे (रा.सुदर्शन कॉलनी) व मॅनेजर योगेश हरि कर्डीले (रा.सुप्रिम कॉलनी) यांच्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या पथकाने केली कारवाई

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, गोविंदा पाटील, हेमंत कळसकर, सुधीर साळवे यांच्या पथकाने केली.

 

Protected Content