Home Cities जळगाव ‘त्या’ दोघा सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या : सीटूची मागणी (व्हिडिओ)

‘त्या’ दोघा सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या : सीटूची मागणी (व्हिडिओ)

0
36

जळगाव, प्रतिनिधी ।  महानगरपालिकेत मागील वीस वर्षापासून रोजंदारी, कंत्राटी व मानधनावर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचारी अशोक रामा सोनवणे व नंदू शहादु   नाडे यांना कायम सेवेत घेण्यात यावे यामागणीसाठी सीटूतर्फे महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

महापालिकेत मागील २०  वर्षांपासून आरोग्य विभागात मृत जनावरे वाहून नेण्याचे काम अतिशय चोखपणे पार पडणाऱ्या कामगारांना आजपर्यंत अनेक वेळा लोकशाही मार्गाने आंदोलन,  धरणे , बेमुदत उपोषण करून आपल्या समस्या मनपा प्रशासनाला समोर मांडल्या.  परंतु,  आज पर्यंत या दोघा  कामगारांना कायम सेवेत घेण्यात आले नाही.  मनपा प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन अशोक सोनवणेम  नंदू शहादू नाडे यांना आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी म्हणून कामास कायम सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी लाक्षणिक उपोषण करीत असताना कॉम्रेड विजय पवार यांनी केली.  मागणी मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला याप्रसंगी नंदू नाडे, अशोक सोनवणे, कॉम्रेड  प्रवीण चौधरी आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/304023464789388

 


Protected Content

Play sound