पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पोलिसांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासह पोलिसांच्या मुलांना शैक्षणिक व पोलिस भरतीमध्ये आरक्षण द्यावे, अशा मागणीसाठी पोलिस बॉईज आसोसिएशन पदाधिकऱ्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.
जळगाव पोलिस बॉईज असोसिएशन ही नेहमीच आपल्या न्याय व हक्कासाठी तत्पर असलेली असोसिएशन असुन याच अनुषंगाने राज्यातील सेवेत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पोलिस भरती प्रक्रियेत दिलेल्या पोलिस पाल्य आरक्षणात समावेश करावा तसेच पोलिस पाल्य आरक्षण वाढवून द्यावे. या रास्त मागणीसाठी पोलिस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.
याप्रसंगी पोलिस पाल्य आरक्षणावर लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिलीप वळसे पाटील यांनी भेटी अंती दिले आहे. यावेळी जळगाव जिल्हा अध्यक्ष हर्षल हिरालाल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भूषण नागरे, जिल्हा सचिव प्रफुल प्रदीप पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शकील शेख, कार्याध्यक्ष बंटी पाटील, मंगलसिंग राजपूत, डॉ. अतुल पाटील, प्रशांत भावसार, करण पाटील, नीलेश चौधरी सह पोलीस बाॅईज असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.