मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळे १४ दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर २०२०च्या अट्रोसिटीच्या दाखल गुन्ह्यात अभिनेत्री चितळेला गुरुवारी अटक करण्यात आली असून आज ठाणे कोर्टाने तिची २४ मे पर्यत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. गुरुवारी गोरेगाव येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी पोलीस पोचण्यापूर्वीच रबाळे पोलिसांनी २०२० मधील अट्रोसिटीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केली. केतकी चितळे ने अनु.जाती जमाती संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यावरून ऍड. स्वनिल जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु या प्रकरणी अटक करण्यात आलेली नव्हती. तक्रारदाराच्या तक्रारीवरून रबाळे पोलिसांनी तिला गुरुवारी अटक करीत आज तिला ठाणे येथील विशेष अट्रोसिटीच्या न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.