होतकरू तरूणांसाठी सीसीआयडीतर्फे निशुल्क आर्मी व पोलीस भर्ती प्रशिक्षण (व्हिडीओ)

Traning

जळगाव प्रतिनिधी । कंट्रोल क्राईम इन्फॉमेशन डिटेक्टीव्ह ट्रेनींग सेंटर (सीसीआयडी)च्या वतीने जिल्ह्यासह राज्यातील गरीब, होतकरू आणि सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना रोजगार व शासकीय सेवेतील पोलीस आणि आर्मी भरतीतून काम करण्याची संधी मिळावी यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्राची सुरूवात शहरातील जलराम नगर, गिरणा नदी तटीजवळ उभारणी केली असल्याची माहिती केंद्र प्रमुख राजेंद्र निकम यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यजूला बोलतांना सांगितले.

या संस्थेची मुख्य शाखा मथूरा येथे असून जळगाव जिल्ह्याचे प्रमुख निकम हे काम पाहत आहे. जळगाव जिल्ह्यासह इतर ठिकाणी सदयस्थितीत अडी-अडचणीत, संकटात तसेच इतर काही समस्यांनी ग्रस्त असलेल्या जनतेसाठी त्यांच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी आमच्या संस्थेमार्फत समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरूण तरूणी यांना रोजगार मिळावा हा हेतू डोळयासमोर ठेवून काम करीत आहे.
याच अनुषंगाने संस्थेच्या वतीने जळगावात काम करण्याचे उदिदष्ट डोळयासमोर ठेवून प्रायोगिक तत्त्वावर जळगाव जिल्हासाठी 10 एप्रिल पासून बेरोजगार तरूण-तरूणींना आर्मी, पोलीस भरतीचे प्रशिक्षण निशुल्क देण्याचे सुरू केले आहे.

मंगळवार 30 एप्रिल आणि बुधवार 1 मे या दोन दिवसात केंद्रात प्रशिक्षण घेत असलेले 18 विद्यार्थ्यांनी शहर वाहतूक शाखेच्या सहकार्याने शहरातील अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, प्रभात चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेडीयम परीसर, शिवाजी महाराज चौक आण टॉवर चौक या आठ ठिकाणी जावून प्रशिक्षणार्थ्यांनी शहर वाहतूक शाखेच्या पोलीसाबरोब काम करत त्यांना वाहतूकीची कोंडी होवू नये, तसेच वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी मदत केली. यावेळी काम करत असतांना शासकीय कामांची प्रत्यक्षात जवळून ओळख आणि कामाचा अनुभव यायला लागला आहे. हा एक प्रशिक्षणाचा भाग असल्याचे प्रशिक्षण केंद्रांचे प्रमुख निकम यांनी सांगितले.

यामध्ये प्रामुख्याने तरूणांना शासनाचे अधिकारी कर्मचारी यांना मदत होईल हा हेतू डोळयासमोर ठेवून अडी-अडचणींचे वेळेस आमच्या संस्थेचे ट्रेनर्स शासनाच्या मदतीस धावून येतील. सघ्यस्थितीत आमच्या संस्थे अंतर्गत ज्या विदृयार्थ्यांना पोलिस भरती व आर्मी भरतीचे एक महिन्याचे ट्रेनीग घेतलेले आहे ती मुले आज जळगाव शहरात 8 ते 10 ठिकाणी वाहतूक पोलीसांना मदतीचे काम 3 दिवसांसाठी निशुल्क सेवेमध्ये काम करत आहे. सदरील मुलांची आर्थिक परिस्थ्‍िाती ही अत्यंत गरीबीचे असल्याने ते दुसरीकडे फि भरून पोलीस / आर्मी भरतीचे प्रशिक्षण घेऊ शकत नाही. अशांमुळे मुले ही मागे पडत होती. हाच उद्देश डोळयासमोर ठेवून आमच्या संस्थेने गरीब, होतकरू मुले-मुली यांना निशुल्क ट्रेनिंग घेत आहेत.  सदरील मुलांना ट्रेनींग देण्याचे काम हे संस्थेचे ट्रेनर्स भगवान कोळी (सेवानिवृत्त बी.एस.एफ.जवान), चेतना जाधव (एन.सी.सी.मास्टर), अक्षय परदेशी (एन.सी.सी), सतीश सैंदाणे यांचेकडून मिळत आहे. गरीब आणि होतकरून विद्यार्थ्यांना प्रशिक्षाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी राजेंद्र निकम (942277566) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content