ब्रेकींग : एसटी कर्मचार्‍यांना आझाद मैदानातून हटविले !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काल शरद पवार यांच्या निवासस्थानी राडा झाल्यानंतर रात्री पोलिसांनी एसटी कर्मचार्‍यांना आझाद मैदानातून हटविले असून कर्मचार्‍यांनी सीएसटी स्थानकात ठिय्या मांडला आहे.

परवा न्यायालयाने एसटी कर्मचार्‍यांना नोकरीवर हजर होण्याचे निर्देश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र काल दुपारी अचानक कर्मचार्‍यांचा एक जमाव शरद पवार यांच्या निवासस्थानी चाल करून गेला. तेथे या कर्मचार्‍यांनी धुडगुस घातल्याने राज्यात प्रचंड खळबळ उडाली. यानंतर एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, आज पहाटे चारपासून पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली. एसटी आंदोलकांना आझाद मैदानातून बाहेर ककाढून पोलिसांनी आझाद मैदान पूर्णपणे रिकामे केले आहे.

आझाद मैदानातून बाहेर काढल्यानंतर एसटी आंदोलनक आता जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर ठिय्या देऊन बसले आहेत. आमच्या सर्व सहकार्‍यांना घेतल्याशिवाय आम्ही माघारी परतणार नाही, अशी भूमिका या एसटी आंदोलकांनी घेतली आहे.

Protected Content