यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजव्दारे संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील परिपत्रकानुसार राष्ट्रीय सेवा योजना एकक व यावल नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त भारत अभियान रॅलीचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व यावल नगरपरिषद मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले.
प्रारंभी या अभियानात प्लास्टिक मुक्त व पर्यावरण जनजागृतीची प्रतिज्ञा घेण्यात आली. महाविद्यालयातील परिसरात प्लास्टिक व कचऱ्याचे संकलन करण्यात आले. सकाळी रॅलीची सुरुवात ही महाविद्यालयाच्या मैदान परिसरातुन होऊन बस स्थानक परिसर, टी पॉईंट, बुरुज चौक, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय मार्गे तहसील कार्यालयात यावल तहसीलचे तहसीलदार महेश पवार यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला.
दरम्यान विद्यार्थ्यांनी यावल बस स्थानक, ग्रामीण रुग्णालय व तहसील कार्यालय आदी परिसरात प्लास्टिक व कचरा संकलन करून सोबत असलेली कचरा गाडीत जमा करून प्लास्टिक व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. सदर वरील परिसरात प्लास्टिक वापर व प्लास्टिक निर्मूलन बाबत जनजागृती करण्यात आली तसेच विविध घोषणा देण्यात आल्या. या अभियानात स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या अभियानात उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. डी. पवार, स्वच्छ महाराष्ट्र अभियान नगरपरिषद यावल शहर समन्वयक तुकाराम सांगळे, स्वच्छता निरीक्षक वीरेंद्र घारू, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. सुधा खराटे, महेश जाधव, सि. टी. वसावे, स्वच्छता कर्मचारी दिनेश घारू आदी सहभागी होते. प्लास्टिक मुक्त अभियान रॅलीचे यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, प्रमोद कदम, अनिल पाटील, संतोष ठाकूर , नवमेश तायडे, टिनू पाटील, तेजश्री कोलते, प्राची पाटील, चेतना कोळी यांच्या मोठया संख्येत विद्यार्थ्यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.