पाचोरा प्रतिनिधी । शासनाच्या “माझी वसुंधरा” अभियानातील विविध उपांगाअंतर्गत दि. १६ रोजी पाचोरा शहरातील विविध प्लास्टीक पिशव्या (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर जप्तीची धडक मोहिम राबविण्यांत आली.
महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांचेकडील परिपत्रक महाराष्ट्रत प्लास्टीक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, विक्री, वापर, वाहतुक, हाताळणी, साठवणूक) अधिसुचना २०१८ नूसार प्लास्टीक कॅरी बॅग, नॉन ओव्हर पिशव्या वापरास बंदी घातलेली आहे. त्याच प्रमाणे शासनाच्या “माझी वसुंधरा” अभियानातील विविध उपांगाअंतर्गत दि. १६ रोजी पाचोरा शहरातील विविध प्लास्टीक पिशव्या (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर जप्तीची धडक मोहिम राबविण्यांत आली नगरपरिषदेकडून पथक तयार करण्यांत आलेल्यां असून शहरातील सुमारे १५ दुकानदानांकडून प्लास्टीक पिशव्या जप्त करुन ७ हजार ५०० तसेच मास्क न लावणा-या दुकानदारांकडून २ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यापुढे देखील दररोज शहरातील आस्थापना, दुकाने, फेरीवाले, हॉटेल्समध्ये अनाधिकृतपणे व शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टीक पिशव्या जप्त करण्याची धडक मोहिम सुरुच राहणार असून सुचना देऊन देखील पुन्हा – पुन्हा बंदी असलेल्याट प्लास्टीक पिशव्या विक्री करणा-या दुकानदारांविरुध्दा कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
यात प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुस-या गुन्ह्या साठी १० हजार रुपये व तिस-या गुन्ह्या साठी २५ हजार रुपये तसेच तीन महिने कैद अशी दंडाची तरतूद असल्याने नागरीकांनी देखील प्लास्टीक पिशव्यांचा वापर पुर्णपणे बंद करुन घरुनच कापडी पिशवी घेऊन बाहेर पडावे व शहरातील विघटन न होणा-या कच-यात भर टाकू नये तसेच आपल्याु घरात निर्माण होणारा कचरा हा उघडयावर न टाकता घंटागाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करुनच द्यावा, शहरातील सामाजीक संस्थांतशी संपर्क करुन प्लास्टीक बंदी मोहीमेत उत्स्फुलर्त सहभाग नोंदवावा तसेच प्लास्टीक वापराबाबत काही शंका असल्यासस व्यापारी बांधवांनी नगरपरिषदेत येऊन शंका निरसन करण्यांचे देखील आवाहन मुख्यापधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले.
सदरची मोहीम मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून मोहीमेत प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, राजेश कंडारे, जयराम बजाज, किशोर मराठे, नरेश आदिवाल, राजू लहासे, निळकंठ ब्राम्हणे, बापु ब्राम्हणे, राकेश फतरोड, वाल्मिक गायकवाड, संजय जगताप, विजय ब्राम्हणे, प्रशांत कंडारे, सुनील वाकडे, अमोल अहिरे, सुशिल सोनवणे, आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.