सामूहिक वृक्षारोपणातील झाडांना लावली आग

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील दहिवद येथे लोकसहभागातून लावण्यात आलेल्या झाडांना रात्री अज्ञात समाजकंटकांनी आग लावल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मौजे दहिवद विकास मंच अंतर्गत २६जुलै २०१८ रोजी एक मिनिटात १००८ रोपे लावण्यात आली होती. यानंतर या रोपांचे चांगले संवर्धन करण्यात आले होते. मात्र काल रात्री काही समाज कंटकांनी आग लावली .त्या आगीत १०० ते १५० झाडे होरपळून निघाली. गावकर्‍यांनी धाव घेऊन आग विझवल्यामुळे इतर वृक्ष बचावले. वृक्ष मित्र पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व झाडे लावण्यात आली होती. या कामासाठी सर्व गांव एकत्र आले होते व कार्यक्रमाच्या वेळी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यात दहिवद या एकमेव गावाने येवढा भव्यदिव्य कार्यक्रम घेतला होता. मात्र काही समाजकंटकाना ते सहन होत नाही.त्यामुळे ते अशी दुर्बुद्धी वापरून चांगल्या कामाला अप्रत्यक्षपणे विरोध करत असतात. या प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी वृक्षमित्र पंकज पाटील यांनी केली आहे.

Add Comment

Protected Content